Ahmednagar News : आधी दारू पाजली, अनैसर्गिक कृत्य करण्यास नकार दिल्याने युवकाचा ठेचून खून

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : एमआयडीसी परिसरातील खुनाचा उलगडा झाला असून हा खून अनैसर्गिक कृत्य करण्याच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे.

आधी दारू पाजली, परंतु नंतर अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळा आवळून व डोक्यात दगड घालून हा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

संदीप कमलाकर शेळके ऊर्फ बाळू (रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यांचा एमआयडीसी परिसरात खून झाल्याचे नुकतेच समोर आले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपीना आग्रा येथून ताब्यात घेतले आहे. विशाल चिंतामण जगताप (वय 22 रा. चेतना कॉलनी, एमआयडीसी) व साहील शेरखान पठाण (वय 20 रा. लेडोंळी मळा, नागापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

समजलेली अधिक माहिती अशी : शुक्रवारी सकाळी एमआयडीसीतील एका कंपनीच्या पडक्या इमारतीत संदीप शेळके याचा मृतदेह सापडला होता.

त्यांच्या चेहर्‍याचा चेंदामेंदा झालेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींवर खूनाचा गुन्हा दाखल झालेला होता व पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थाानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेशित केल्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक हेमंत थोरात,

पोलीस अंमलदार रवींद्र कर्डिले, विशाल दळवी आदींच्या पथकाने आजुबाजूस राहणार्‍या लोकांकडे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करायला सुरवात केली.

या तपासात त्यांना मयत संदीप शेळके हे बुधवारी (दि. 21) विशाल जगताप व साहील पठाण यांच्यासोबत दारू पिल्याची माहिती समजली.

या दोघांच्या घरी चौकशी केली असता ते ते दोन दिवसांपासून घरी नसल्याची माहिती मिळाली. विविध तपासाअंती ते शहागंज मोहल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश येथे असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी त्या ठिकाणी जात आरोपींना ताब्यात घेतले.

संदीप सोबत अनैसर्गिक कृत्य करायचं होते, त्याला जास्त दारू पाजून एमआयडीसीतील बंद पडलेल्या कंपनीचेत नेले पण त्याने विरोध करताच त्याचा खून केल्याचे आरोपींनी कबूल केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe