अबब…पावणेसहा लाखाची दारू ओतली चक्क गटारीत…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Ahmednagar crime:- राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अनेक वर्षापासून दारूबंदीच्या गुन्ह्यातील जप्त केलेली दारू पोलिसांनी गटारीत ओतून दिली आहे. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यात जप्त मुद्देमाल पडून होता.

सन 2018 पासून जवळपास १५० गुन्ह्यातील पावणेसहा लाखाची दारू त्यामध्ये देशी-विदेशी दारूच्या बाटल्या पडून असल्यामुळे पोलीस निरीक्षक दराडे यांनी न्यायालयाकडून या दारूला नष्ट करण्याची परवानगी मिळवली.

त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राहुरी पोलिसांनी पावणेसहा लाख देशी-विदेशी दारुचा मुद्देमाल गटारीत टाकून नष्ट केला.

यावेळी पोलीस निरीक्षक यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री. कोल्हे, पोलीस हेडकोन्स्टेबल अजिनाथ पाखरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe