वर्षांनुवर्ष फरार, पाहिजे असलेल्या 1163 आरोपींवर कारवाई; जिल्हा पोलिसांची मोठी कामगिरी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News  :- पोलिसांना चकवा देऊन वर्षांनुवर्ष फरार असलेल्या 1163 आरोपींवर जिल्हा पोलिसांनी कारवाई केली. काहींना अटक केली तर काही आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

उच्च न्यायालयात शिक्षा झालेले, फरार, पाहिजे व स्टॅण्डींग वॉरंट असलेले चार हजार 682 आरोपी वर्षांनुवर्ष पोलिसांना चकवा देत फरार झाले होते.

अशा आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक पाटील यांनी 1 जानेवारी, 2022 ते 6 मार्च, 2022 या दरम्यान विशेष मोहिम राबविली होती.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह तालुकास्तरावरील सर्व पोलिसांंना तशा सुचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक अनिल कटके या मोहिमेवर लक्ष ठेऊन होते.

फरार असलेल्या 45 आरोपींपैकी 16 आरोपींना, पाहिजे असलेल्या चार हजार 444 आरोपींपैकी एक हजार 86 आरोपींना, स्टॅडिंग वॉरंंटमधील 180 पैकी 59 आरोपींना आणि उच्च न्यायालयात शिक्षा झालेल्या 13 आरोपींपैकी दोन अशा 1163 आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली.

यामध्ये 798 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 35 आरोपी यापूर्वीच अटक केले असल्याचे पोलिसांनी काढलेल्या माहितीतून समोर आले.

तर 39 आरोपी मयत झाले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयामध्ये यापूर्वीच निकाली काढलेल्या खटल्यातील आरोपींची संख्या 291 ऐवढी असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

सदरची मोहिम अधीक्षक पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कटके, सर्व पोलीस ठाण्याचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचार्‍यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe