श्रीरामपूरः एका ५६ वर्षीय नराधमाने नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सव्वापाच वाजेच्या दरम्यान एका गावातील परिसरातील मंदिराच्या बाजुला झाडाजवळ हा प्रकार घडला
याबाबत पोलिसांनी पीडितेच्या कुटूंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संजय दगडु गांगुर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सव्वापाच वाजेच्या दरम्यान, एका मंदिराच्या बाजुला झाडाजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी बुधवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपअधिक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने एका मंदिराच्या बाजूला असलेल्या झाडाजवळ ओढुन नेऊन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे गैरकृत्य करुन तिच्यावर अत्याचार केला आहे.
त्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशानुसार शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.