अहमदनगर शहरात प्रेमदान चौकात अपघात; व्यावसायिकाचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-मनमाड महामार्गावर प्रेमदान चौकात भरधाव चारचाकीने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बांधकाम व्यावसायिक अभियंता अजय चंद्रकांत आकडे (वय ५७, रा. शिंदे मळा, बालिकाश्रम रस्ता) असे मृताचे नाव असून, मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी बुधवारी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक अजय आकडे हे प्रोफेसर चौकातून प्रेमदान चौक मार्गे बालिकाश्रम रस्त्याकडे जात असताना प्रेमदान चौकात भरधाव वेगात आलेल्या एका स्कॉर्पिओ वाहनाने त्यांना धडक दिली.

अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, त्यांच्या पश्चात वडील निवृत्त उपजिल्हाधिकारी चंद्रकांत आकडे, भाऊ पोलिस उपअधीक्षक अनिल आकडे, पत्नी सोनल व मुलगी डॉ. गृषा असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe