युवतीचा विनयभंग करून सराईत आरोपी पळाला; एलसीबीने बीड जिल्ह्यात पकडला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- युवतीचा विनयभंग करून पसार झालेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेवराई (जि. बीड) येथून जेरबंद केला.

संदीप दिलीप कदम (वय 28 रा. डोंगरगण ता. नगर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे कोपरगाव तालुका, लोणी, तोफखाना, एमआयडीसी, कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

दरम्यान कदम याने एका युवतीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडित युवतीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात 13 जानेवारी 2022 रोजी फिर्याद दिली होती.

कदम विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो पसार होता. त्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस अंमलदार बबन मखरे, मनोज गोसावी,

सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार, शिवाजी ढाकणे, बबन बेरड यांच्या पथकाने आरोपी कदम याला गेवराई येथून ताब्यात घेत अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe