अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यास नकार देणार्या फिर्यादीच्या नातेवाईकाचा खून करण्याची धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यातील सोनविहिर येथे घडली होती.
या गुन्ह्यात आरोपी विकास फुलसिंग भोसले (रा. मोरे चिंचोरा ता. नेवासा) यास जन्मठेपेची व 15 हजार रूपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस ठाण्यात दाखल केलेला एक गुन्हा मागे घ्यावा, असे या गुन्ह्यातील आरोपी विकास फुलसिंग भोसले आणि रवी फुलसिंग भोसले (दोघे रा. मोरे चिंचोरा ता. नेवासा) हे फिर्यादीचे नातेवाईक वृद्धेश्वर पुंजाराम काळे (रा. सोनविहिर ता. शेवगाव) यांच्याकडे नेहमी मागणी करत होते.
मात्र गुन्हा मागे घेण्यास वृद्धेश्वर हे तयार नव्हते. विकास भोसले, रवी भोसले आणि वृद्धेश्वरचा भाऊ सुरेश पुंजाराम काळे आणि मनिषा सुरेश काळे हे 7 फेब्रुवारी 2020 रोजी वृद्धेश्वरच्या घरी गेले.
गुन्हा मागे घे बोलले वृद्धेश्वर यांनी गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने संतापलेल्या रवी भोसले याने वृद्धेश्वर यांच्या छातीमध्ये चाकू खुपसला. त्यानंतर वृद्धेश्वर यांना उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. मयत वृद्धेश्वरची पत्नी सुनिता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपी विकास, रवी भोसले, सुरेश काळे आणि मनिषा काळे यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी आरोपींना अटक केली या खटल्यात सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. मनिषा काळे हिच्याविरुद्ध सबळ पुरावा आढळून न आल्याने तिला मुक्त करण्यात आले. विकास भोसले याच्याविरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास खुनाबद्दल जन्मठेप आणि 10 हजार रूपये दंड ठोठावला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम