Ahmednagar News : पोलिस अधिकारी म्हणून लोकांची फसवणूक करणारा आरोपी गजाआड

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : तोतया पोलिस अधिकारी म्हणून लोकांची फसवणूक करणारा आरोपी गजाआड करण्यात आला आहे. सतिष काशिनाथ झोजे (वय २९, रा. ढवणवस्ती, अ. नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

सतिष झोजे हा पोलिस अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करतो अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली. झोजे हा पाईपलाईन रोडवरील सिटी लॉन्स येथे स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एम. एच. १२ एच. व्ही. ९०८१) येणार असल्याची माहिती कळताच पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला.

सतिष झोजे त्या ठिकाणी आला असता त्याची चौकशी करण्यात आली. त्याने पोलिस उपनिरीक्षक असून मुख्यालयास नेमणुकीला असल्याचे सांगितले. त्याची सखोल चौकशी केली असता तो तोतया पोलिस अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले.

त्याच्याकडील कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात पोकॉ. अमृत आढाव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर,

पोहेकॉ. अतुल लोटके, पोना. सचिन अडबल, रविंद्र कर्डिले, संतोष लोंढे, फुरकान शेख, सतिष खैरे, सागर गवांदे, रणजित जाधव, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe