Ahmednagar News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी २४ तासांत जेरबंद

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी २४ तासांत जेरबंद करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की दिनांक १८ फेब्रुवारी २०२४५ रोजी अल्पवयीन मुलगी कोपरगाव बसस्थानकात बसलेली असताना आरोपी मोहसीन शेख याने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले व तिचा पाठलाग करून वाईट हेतूने तिचा हात धरुन तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

याबाबत कोपरगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता, ही घटना संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार बाळासाहेब मुळीक, रविंद्र कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ व उमाकांत गावडे यांचे पथक नेमुन फरार आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या.

पथक आरोपीच्या वास्तव्याबाबत माहिती घेत असताना आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की आरोपी मोहसिन शेख हा कोपरगावातील गांधीनगर येथे आला आहे. या माहितीवरून पथकाने लगेच त्याला ताब्यात घेतले.

पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची माहिती दिली. त्यास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.

पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe