अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- कोपरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती लिलावाच्या शेडमध्ये ठेवलेल्या तीस हजार रुपये किमतीच्या ६ क्विंटल (१२ गोण्या) सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना येथे घडली.
गुरुवारी( २ डिसेंबर) सांयकाळी बाजार समितीच्या लिलाव शेडमध्ये सुमारे १५० गोण्या होत्या. सदर ठिकाणी डबलसिंग करणशिंग थापा हा रात्री वॉचमन म्हणुन ड्युटीवर होता.
बाजार समितीचे सचिव नानासाहेब सोपान रणशुर हे ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता बाजार समितीत आले असता त्यांना संतोष ज्ञानदेव सांगळे यांनी लिलाव शेडमधून सोयाबीनच्या १२ गोण्या चोरीस गेल्याबाबत सांगितले.
सचिव रणशूर यांनी सीसी टीव्ही कॅमेरा चेक केला असता ज्ञानेश्वर दादा सोनवणे याने २ डिसेंबरच्या रात्री १० ते ३ डिसेंबर सकाळी ९ वाजेच्या दरम्यान त्याची विना नंबरची टाटा कंपनीची छोटा हत्ती या गाडीतून
सोयाबिनच्या १२ गोण्या चोरून नेताना आढळून आला असल्याचे सचिव रणशूर यांनी फिर्यादीत म्हटले. यावून ज्ञानेश्वर दादा सोनवणे (रा. धारणगाव) यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम