Ahmednagar News : शहरात बाजार पेठीतील चार दुकाने फोडून घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपी चार दिवसात जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की दि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री राहुरी शहरातील विविधी दुकाने फोडुन एकुण ४६ हजार रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात आरोपींनी चोरी केले होता.
त्यावरुन राहुरी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये आरोपीबाबत काहीएक माहिती नसतांना तांत्रीक पुराव्याच्या आधारे व राहुरी शहरातील सी.सी. टी.व्ही. फुटेजवरुन केलेल्या तपासामध्ये एक संशयीत आरोपीची माहिती उपलब्ध झाली.
ही माहिती सोशल मीडीयाच्या आधारे प्रसारीत केल्याने आरोपी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पेरजापूर येथील दगडुबा मुकुंदा बोर्डे असल्याचे निष्पन्न झाले.
त्यास ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशन येथे आणुन त्यास अटक करण्यात आली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास दि. २९ फेब्रुवारी रोजीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके करत आहेत. नाशिक परीक्षेत्रचे विशेष पोलीस पोलीस महानिरीक्षक यांनी ‘एक सी. सी.टी.व्ही. कॅमेरा दुकानासाठी व एक शहरासाठी’ अशी संकल्पना राबविलेली आहे. त्यामुळेच गुन्हा उघडकीस आलेला आहे.
तरी नागरिक व व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ह बसवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे,
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, विकास वैराळ,
बाबासाहेब शेळके, विकास साळवे, प्रमोद ढाकणे, अमोल गायकवाड, पोलीस नाईक सचिन धनद, संतोष दरेकर, रामेश्वर वेताळ यांनी केली.