अहमदनगरमध्ये बेडीसह पलायन केलेला आरोपीस पुन्हा अटक

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पोलिस व्हॅनमधून बेडीसह पलायन केलेला आरोपी पुन्हा पकडण्यात आला आहे. ऋतीक उर्फ सनी रमेश लिपाने (रा. तपोवन रोड) असे आरोपीचे नाव आहे. बुधवारी (दि. ६) पहाटे सबजेलसमोर हा प्रकार घडला.

पलायन केलेल्या आरोपीला सिद्धार्थनगर परिसरात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो स्टेटसला ठेवल्या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली होती.

ऋतीक लिपाने व अन्य एका महिला असल्याने तील सबजेलमध्ये पोहोच करण्यासाठी पोलिसांची व्हॅन तेथे गेली. त्यावेळी आरोपी ऋतीक लिपाने याच्या हातात बेडी होती. सफौ. दिलीप अकोलकर यांनी लिपाने याच्यावर लक्ष ठेवण्याच्या सुचना पोना. हरिश्चंद्र माने व पोकॉ. गौतम डुचे यांना दिल्या होत्या.

महिला होमगार्ड आडोळे यांच्या समवेत त्या महिला आरोपीला सबजेलमध्ये ते घेवून गेले. मात्र तेथे महिला आरोपींना ठेवण्याची व्यवस्था नसल्याने सबजेलमधून त्यांना राहुरीच्या लॉकअपमध्ये घेवून जायचे होते.

महिला आरोपीसह पोलिस व्हॅनकडे अले असता तेथे पोना. माने व पोकॉ. डुचे आजूबाजूला शोधाशोध करत होते. आरोपी ऋतीक लिपाने हा नजर चुकवून बेडीसह पोलिस व्हॅनमधून पळून गेल्याचे त्यांनी सांगितले.

पलायन केलेल्या आरोपीची शोधाशोध केली असता तो सिद्धार्थ नगर परिसरात आढळून आला. सफौ. अकोलकर यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात भादविकच्या २२४ प्रमाणे दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe