Ahmednagar City News : घरगुती गॅस एलपीजी वाहनात भरणारा आरोपी अटकेत

Published on -

Ahmednagar City News : घरगुती गॅस अवैधरित्या एलपीजी वाहनात भरणारा आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. सचिन प्रकाश शिंदे रा. वैदूवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्याकडून ६७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, सफौ. बाळासाहेब मुळिक, पोना. सचिन अडबल, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, रणजित जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe