Ahmednagar News : दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीने आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याला गजाआड करण्यात आले आहे. सर्फराज मोहम्मद इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार ( वय ३४, रा. मेहराज मस्जिदजवळ, मुकुंदनगर, अ.नगर) असे केलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात भादंवि कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सर्फराज मोहम्मद इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार याला दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते. हद्दपार करूनही तो जिल्ह्यात वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
पोलिस पथकाने मुकुंदनगर येथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. १० नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे,
उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, पोसई. तुषार धाकराव, सफौ. राजेंद्र वाघ, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ. अतुल लोटके, संदीप पवार, पोना. रविंद्र कर्डिले, पोकॉ. रविंद्र घुंगासे यांच्या पथकाने ही कारवाई केली.