विनयभंग प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता

Pragati
Published:
vakil

नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या विकास जगदाळे याची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला व फोटो व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

जून 2022 मध्ये नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला व फोटो व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल करून बदनामी केली. कॉलेजला जाताना चोरून पाठलाग करतो असे पीडित महिलेने तथाकथित आरोप करून विकास जगदाळे विरुद्ध नगर तालुका पोलीस ठण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्यानुसार आरोपीला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाने आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकामी साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या.

त्यानुसार आरोपीतर्फे ॲड. विकास ढोकळे यांनी साक्षीदारांची उलट तपास घेतले. त्यामध्ये पीडीतेचा घेतलेला उलट तपास महत्त्वाचा ठरला. त्या अनुषंगाने साक्षीदारांचे घेतलेले उलटतपास व न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद व तपासातल्या त्रुटी विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एच. मोरे यांनी ग्राह्य धरून आरोपीची दिनांक 03/07/2024 रोजी निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात ॲड. विकास ढोकळे, ॲड. प्रवीण तांबे, ॲड. तुषार कोतकर यांनी काम पाहिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe