२५ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगर मनपा आयुक्तांनी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर राज्य शासना अंतर्गत अधिकाऱ्यांचे विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे निर्देशांक रँकिंगमध्ये घसरण झाल्याचे कारण पुढे करून सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.मात्र ही कारवाई वैयक्तिक आकसापोटी केल्याचे पत्र खासदार निलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे.
या पत्रात नमूद केले आहे की,अहिल्यानगर मनपा आरोग्य विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्यावर आयुक्त आरोग्य सेवा यांचेकडील दिनांक २१/०२/२०२४ चे परिपत्रकानुसार राज्य शासना अंतर्गत अधिकाऱ्यांचे विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे निर्देशांकाचे रँकिंगमध्ये चुकीचा आधार घेऊन तसेच शासनाचे नियम डावलून बेकायदेशीररित्या सक्तीच्या रजेवर पाठवल्याबाबत माहिती मिळाली.
या बाबत संबंधित विभागातील आरोग्य कर्मचारी यांचेवर सुद्धा कारवाई करण्यासाठी समिती नेमली आहे.यामध्ये वैयक्तिक आकसपोटी सदरची कारवाई झाल्याचे निदर्शनास येत आहे, डॉ. बोरगे यांचेवर केंद्रशासनाचे कार्यक्रमांसाठी उद्दीष्टपुर्ती करणेसाठी मार्च २०२५ अखेरचा वेळ निर्धारित करण्यात आलेला आहे,त्यामुळे सदरच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण होणार नाही.या दृष्टिने डॉ. बोरगे यांची सक्तीची रजा रद्द करुन रुजु करुन घेणे बाबत आपले स्तरावरून आदेश पारीत होण्याबाबत मागणी केली आहे.