अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- फॅन्सी नंबर प्लेट तसेच विनानंबर प्लेट असे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीधारकांवर पोलिसांनी विशेष कारवाई केली आहे.
मागील 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहिम राबवून जिल्ह्यातील 348 वाहन चालकांविरोधात कारवाई करून एक लाख तीन हजार 200 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पैशाची बॅग लंबविणे, सोनसाखळी चोरी , जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार विना नंबर तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वापरत असल्याने जिल्हा पोलिसांकडून अशा वाहन चालकांविरोधात नाकाबंदी करून कारवाई करण्यात येत आहे.
दुचाकी वाहन चालकांकडून वाहनाचा नोंदणी क्रमांक आकर्षक दिसावा, यासाठी ‘दादा’, ‘मामा’, ‘भाई’ अशा नंबर प्लेटसह नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट लावण्यात येत आहे. तसेच चोर्यामार्या करणार्या सराईत गुन्हेगारांकडून विना नंबर , फॅन्सी नंंबर प्लेटअसलेल्या वाहनांचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे अशा वाहन चालकांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा पोलिसांना दिल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान
वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांकडूनअशा वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 348 जणांकडून एक लाख तीन हजार 200 रूपयांचा दंड वसूल केलाआहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम