अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 Ahmednagar News :- कोळपेवाडी परिसरातील जनावरामध्ये लंम्पी आजराणे थैमान घातले असून नुकतेच दोन जनावंरे दगावली आहे. त्यामुळे पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देेशी बरोबर संकरीत गायीना आजाराची लक्षणे दिसून येत आहे. अंगावर गाठी गाठी येेेवुन त्यातुन रक्त स्राव होतो. यावेळी जनावर चारा पानी सोडून देत असल्याने वजन घटुन जनावरे कमालीचे अशक्त बनते.

खाजगी डॉक्टरांची सेेवा घेण्यापलीकडेे पशुु पालकाना पर्याय उरला नाही. दरम्यान कोळपेवाडी पशुधन विकास अधिकारी किरण खर्डे यांची 15 सप्टेंबरला बदली होऊन ते राहुरी तालुक्यात रूजू झाले.
त्या अगोदर कोळपेवाडीत नवीन पशुधन विकास अधिकारी रुजू होणे गरजेचे असताना आज महिना उलटून देखील अधिकारी हजर न झाल्याने पशुधन उपचार सेवा राम भरोसे बनली आहे.
हा आजार संसर्गजन्य असल्याने ऐकापासुन दुसर्या जनावरांमध्ये झपाट्याने फैलावत जातो. या आजारावर लस संसर्गजन्य आजारामध्ये लाळ्याखरकुत,
फर्र्या, घटसर्प आणि आता थैमान घालीत असलेला लंम्पी यावर वेळीच लसीकरण करणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे कर्तव्य असताना त्यांनी केलेली डोळे झाक करून
पशुधन वार्यावर सोडण्याचा प्रकार आहे. दरम्यान येत्या आठ दिवसात कोळपेवाडी पशूधन विकास अधिकारी पदी पुर्णवेळ अधिकारी न नेमल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम