अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- जिल्हा परिषदेच्या जागा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेला आहे. त्यानुसार येत्या दोन महिन्यात गट आणि गणाची रचना आस्तित्वात येणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची 20 मार्चला मुदत संपून प्रशासक राज येवून मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता निवडणूक विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
यावर्षी जिल्हा परिषदेचे 10 गट आणि 20 गम वाढणार असल्याने गटाची संख्या 85 आणि गणांची संख्या 170 होणार आहे. त्यामुळे विद्यमान सदस्यांसह नविन इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत.
वाढीव लोकसंख्येच्या गटातील काही गावे दुसर्या गटात जोडण्यात येतील. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीला अवघा एक महिना राहिलेला असताना ही प्रक्रिया अद्याप सुरूच झालेली नाही. त्यामुळे उमेदवार गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.
दरम्यान, 20 मार्चला मुदत संपत असल्याने पुढे आणखी दोन महिने जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त करून मे महिन्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे नगर जिल्हा परिषदेवर किमान दोन महिने प्रशासक राज राहणार असल्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने गट आणि गणांची रचना सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेला दोन महिन्यांचा कालवधी पुरेसा असून त्या काळात नवीन गट आणि गण रचना अस्तित्वात येवू शकते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम