Ahmednagar News : ३५ वर्षानंतर संगमनेरात टोमॅटोचे लिलाव सुरु

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड मध्ये काल सोमवारपासून टोमॅटोचे जाहीर लिलाव सुरु करण्यात आले आहे. तब्बल ३५ वर्षानंतर टोमॅटोचे जाहीर लिलाव सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.

बाजार समितीमध्ये टोमॅटोचा लिलाव सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी टोमॅटो माल खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. लिलाव होत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये माल खरेदी करण्यामध्ये स्पर्धा होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव भेटत आहे.

त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. टोमॅटो या शेतमालाचे जाहीर लिलाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना माल विक्री केल्यानंतर बाजार समिती पक्की हिशोबपट्टी देवून तात्काळ रोख पेमेंट व्यापारी मार्फत दिले जाते.

शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो शेतमाल विक्रीसाठी आणताना योग्य प्रतवारी करुन आणावा, असे आवाहन संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सचिव सतीश गुंजाळ व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe