निवडीनंतर पारनेरचे नगराध्यक्ष अण्णा हजारेंच्या भेटीस, अण्णांनी दिला मौलिक सल्ला

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात निवडणुकांचा धुराळा उडाला होता. नुकतेच जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीवर नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या.

यामधील नगराध्यक्ष पदावर वर्णी लागलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय औटी यांनी निवडीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली.

यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाजसेवेचा आपला वारसा जपण्याचा सल्ला नगराध्यक्ष विजय औटी यांना दिला आहे.

तसेच औटी यांनी नगर पंचायतच्या माध्यमातून समाजासाठी भरीव कामगिरी करा व आदर्शवत काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच पारनेर शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच तालुक्याच्या दृष्टीने नवनवीन योजना राबविण्यात याव्यात. यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देऊन आगामी वाटचालीस शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय औटी यांनी पारनेर शहरातील प्रश्न आ. निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली सोडविण्याबाबत नेहमी प्रयत्न करणार असल्याचा यावेळी अण्णा हजारे यांना विश्वास दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News