Agri Processing Business:- शेतकरी बंधूंनी शेती आणि त्यासोबत एखादा शेती प्रक्रिया उद्योग उभारणे ही काळाची गरज आहे. नुसते शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा त्याला जर उद्योगाची जोड दिली तर शेती आर्थिक दृष्टिकोनातून नक्कीच परवडेल व त्यासोबतच उभारलेल्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उन्नती साधता येते.
शेती प्रक्रिया उद्योगांच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक उद्योग असे आहेत की जे शेतीमालावर आधारित असून अशा उद्योगांचा कच्चामाल हा शेतीतूनच उपलब्ध होतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर यामध्ये टोमॅटो प्रक्रिया उद्योग तसेच बटाटा प्रक्रिया उद्योगांचे आपल्याला घेता येईल.

परंतु या व्यतिरिक्त शेतीमालावर आधारितच असलेला एक उद्योग आणि जरासा हटके समजला जाणारा उद्योग जर पाहिला तर तो म्हणजे लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती करण्याचा उद्योग होय. हा उद्योग शेतकरी बांधवांसाठी खूप फायद्याचा आणि एक महत्त्वाची संधी निर्माण करणार उद्योग आहे. त्यामुळे या लेखात आपण थोडक्यात या उद्योगा विषयी माहिती घेणार आहोत.
लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग कशा पद्धतीने आहे फायद्याचा?
या उद्योगाची एक सकारात्मक बाब पाहिली तर तुम्हाला हा उद्योग उभारण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही. या उद्योगाची बाजारपेठेतील मागणी आणि त्याचा व्यावसायिक दृष्टिकोन जर बघितला तर यामध्ये केली जाणारी गुंतवणूक कमी असते.
परंतु त्या मानाने मिळणारा नफा हा खूप जास्त असतो. शेतकरी तसेच महिलावर्ग हा उद्योग सहजरीत्या करू शकतात. इतकेच नाही तर तुम्ही नोकरी करत असाल तरी देखील तुम्ही तुमची नोकरी सांभाळून हा उद्योग उभारू शकतात.
स्मॉल स्केलवर हा व्यवसाय कसा सुरु कराल?
छोट्या स्तरावर म्हणजेच स्मॉल स्केलमध्ये हा व्यवसाय का सुरू करायचा असेल तर तुम्ही एक छोटासा गाळा घेऊन देखील सुरू करू शकता. या छोट्याशा गाळ्यामध्ये तुम्ही मागच्या बाजूला प्रोडक्शन युनिट आणि समोर तुमचा विक्री युनिट अर्थात सेलिंग युनिट उभारू शकता.
या उद्योगाचे यशाचे गमक जर बघितले तर ते या उद्योगाचे प्रमोशन आणि मार्केटिंग यामध्ये दडले आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला खूप जोरकसपणे आणि लक्ष देऊन करणे खूप गरजेचे आहे. एकदा का तुम्ही या उद्योगाची मार्केटिंग उत्तम पद्धतीने केली तर तुमचा एक बेसिक फॉर्मुला तुमच्यासमोर तयार होतो व हा उद्योग पुढे कसा न्यायचा याचे स्पष्ट चित्र तुमच्यासमोर उभे राहते व त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करू शकतात.
तुमचे उत्पादन प्रत्येक घरामध्ये कसे पोहोचेल या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही एखादा छोटासा कार्यक्रम ठेवू शकतात व त्या कार्यक्रमाला लोकांना बोलवून तुम्ही तुमच्या उद्योगाचे मार्केटिंग करू शकतात. या उद्योगांमध्ये जर तुम्ही 13 किलो शेंगदाण्याचा घाणा घेतला तर त्यापासून पाच ते साडेपाच किलो तेल मिळते.
खोबऱ्याचा घाणा 22 किलोचा असतो व त्यातून जवळपास 50% तेल निघते. यामधून जे काही तेल निघते ते मोठ्या टाक्यांमध्ये साठवले जाते व यात तेलामधील असणारे जे काही कण असतात ते खाली स्थिर होतात व चांगले असणारे तेल आपल्याला वरील बाजूला मिळते.
या उद्योगा विषयी थोडक्यात महत्त्वाची माहिती
थोडक्यात जर हा उद्योग बघितला तर या उद्योगासाठी कमीत कमी दोन लाख रुपयांचे भांडवल तुम्हाला लागते. कच्चामाल म्हणून तुम्ही सूर्यफूल, शेंगदाणा तसेच तेल साठवण्यासाठी लागणारी टाक, पॅकिंग करण्याकरिता बॉटल्स आवश्यक असतात.
यंत्रसामग्रीच्या दृष्टिकोनातून बघितले तर तीन एचपीचा मोटार घाणा तुम्हाला यामध्ये लागेल किंमत बघितली तर ती साधारणपणे एक लाख 37 हजार रुपयांच्या आसपास असते. मनुष्यबळाचा विचार केला तर साधारणपणे दोन किंवा तीन व्यक्तींची आवश्यकता या उद्योगात तुम्हाला भासू शकते.
यामध्ये तुमचे तयार तेल तुम्ही आजूबाजूच्या किराणा दुकानांना विकू शकतात आणि मोठे मॉल्सला देखील तुम्ही तुमचे उत्पादन विकू शकता. उत्तम मार्केटिंग प्लॅनिंगने तुम्ही चालला तर हा व्यवसाय कमी वेळेत चांगला प्रसिद्ध होऊन खूप चांगल्या पद्धतीने नफा तुम्ही या माध्यमातून मिळवू शकता.