Ahmednagar News : महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावीत विधेयकामधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावीत पाचही कायदे रद्द करण्यासाठी निषेध म्हणून २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत अहमदनगर जिल्हयातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची कृषी सेवा केंद्र बंद राहतील.
याबाबत अहमदनगर डिस्ट्रीक्ट फर्टिलायझर्स सीडस अॅण्ड पेस्टीसाईडस डिलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक, कृषी विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्ष सुनिल उर्फ सतिष मुनोत, सेक्रेटरी संग्राम पवार, खजिनदार रमेश खिलारी, उपाध्यक्षा सौ. मनिषाताई खामकर, आदीत्या बोरा, निरल गुगळे, राजुशेठ जोशी महादेव शेळके, बाबासाहेब आठरे, विजय गांधी, दिलीप कोकणे, गिरीश ” वारुळे व जिल्हयातील कृषी विक्रेते उपस्थित होते.
कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यासाठी सध्या प्रचलित असलेले पुरेसे कायदे असतानाही शासनाकडून नवीन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
प्रस्तावीत कायद्यातील तरतुदी विक्रेत्यांसाठी अत्यंत जाचक आहेत त्यामुळे विक्री व्यवसाय करणे अशक्यप्राय होणार आहे. योग्य निविष्ठा विक्री करणारे कृषी विक्रेत्यांवर अन्यायकारी कायदे लावू नयेत अशी राज्यातील विक्रेत्यांची मागणी आहे. या मागणीला पाठींबा देत तीन दिवस सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याबाबत निवेदन सादर