शिर्डीमध्ये विविध गुन्हेगारी घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. मागील काही घटना ताजा असतानाच आता दुहेरी हत्याकांडाचा थरार समोर आला आहे.शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या कोपरगाव तालुक्यातील काकडी शिवारात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार
अज्ञात हल्लेखोरांनी भोसले यांच्या वस्तीवर केलेल्या हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसले (वय ३२) व त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले (वय६५)यांची निर्घृण हत्या करण्यात आली.या हल्ल्यात सारखाबाई भोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार सुरू आहेत.

हल्लेखोरांनी घरात प्रवेश करत अचानक हल्ला केला. या घटनेत एक वृद्ध महिला बचावल्या असून त्यांना ऐकू आणि दिसत नसल्यामुळे हल्लेखोरांच्या लक्षात आल्या नाहीत अशी माहिती मिळत आहे. घटनेची माहिती सकाळी त्यांच्या घरून दूध न आल्यामुळे दूध केंद्र चालकमुळे ही घटना समोर आली.
सकाळी नेहमीप्रमाणे दूध घेण्यासाठी कोणीच न आल्याने डेअरी चालकाने शेजारील शेतकऱ्याशी संपर्क साधला. त्या शेतकऱ्याने भोसले यांच्या घरी जाऊन पाहणी केल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
खुनाचे कारण अस्पष्ट
घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली आहे. आरोपी दुचाकीवरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती असून खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
शिर्डी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने व राहाता पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडून परिसरात कसून शोधमोहीम सुरू आहे. शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .