Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधील ‘या’ सरपंचांचा मुलगा लाचलुचपतच्या जाळ्यात, ठेकेदाराकडे मागितले १ लाख..

Published on -

अहिल्यानगरमध्ये नुकत्याच लाचलुचपतच्या काही कारवाया झाल्या. यात महसूलच्या काही अधिकाऱ्यांना ताब्यातही घेण्यात आलं. आता या घटना ताजा असतानाच आता लाचलुचपतच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. चक्क अहिल्यानगरमधील सरपंचांच्याच मुलाने ठेकेदाराकडे १ लाख रुपयांची मागणी केली.

सरपंचाची रहात वडिलांची सही घेऊन देतो यासाठी एक लाख मागितले. मकरंद हिंगे असे या याचे नाव आहे. दरम्यान, ठेकेदाराला ग्रामपंचायत कडून काम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी ४५ हजार रूपयांची लाच मागणारा वाळुंजच्या सरपंचाचा मुलगा मकरंद गोरखनाथ हिंगे २५ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना २ एप्रिलला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाच्या जाळ्यात सापडला.

अधिक माहिती अशी : तक्रारदार ठेकेदारीचा व्यवसाय करणारा असून त्यांना सहा महिन्यापूर्वी वाळुंज ग्रामपंचायत हद्दीत पेव्हर ब्लॉक बसवण्याचे टेंडर बांधकाम विभागाकडून मिळाले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर

त्यांना दहा लाखाचे बील शासनाकडून मंजूर झाले होते. हे काम पूर्ण झाल्याचा पूर्णत्वाचा दाखला त्यांना वाळुंज ग्रामपंचायतीकडून हवा होता. दाखला देण्याच्या मोबदल्यात सरपंचाचा मुलगा मकरंद हिंगे याने सरपंचाची सही घेऊन देण्याकरीता सरपंचासाठी एक लाख रूपयाची लाचेची मागणी ठेकेदाराकडे केली होती. या संबधी २ एप्रिल ला अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंध विभागास तक्रार मिळाली होती. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी खाजगी इसम मकरंद गोरखनाथ हिंगे

याने पंचासमक्ष तक्रारदारास एक लाख रूपयाची लाचेची मागणी केली. तडजोड़ी अंती ४५ हजार स्विकारण्याचे मान्य करून पहिला हप्ता २५००० स्विकारण्यास तयारी दर्शवली. अहिल्यानगर येथील बुरूडगाव रस्त्यावरील अहिंसा चौकातील सापळा कारवाई दरम्यान आरोपी मकरंद हिंगे यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्याचे विरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे याच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षण अधिकारी अहिल्यानगर पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, सापळा अधिकारी अहिल्यानगर पोलिस निरीक्षक छाया देवरे, सापळा पथक पोलीस नाईक उमेश मोरे, महिला पोलीस हवालदार राधा खेमनार, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ लाड यांच्या पथकाने केली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News