नगर शहरातील चितळे रोड परिसरातील दीपक ऑईल डेपोचे मालक दीपक लालसिंग परदेशी (वय ६८, रा. बोल्हेगाव गावठाण) हे २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पथकांच्या माध्यमातून कसून तपास करत आहेत. मात्र, अद्याप त्यांचा काहीही शोध लागलेला नसल्याने कुटुंबीय अत्यंत चिंतेत आहेत.
बेपत्ता होण्यापूर्वी…
दीपक परदेशी हे २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता बोल्हेगाव गावठाण, मराठी शाळा परिसरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते परतले नाहीत. त्यांच्या बेपत्त्याबाबत कुटुंबीयांनी तत्काळ तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस पथकांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

पोलिसांकडून शोधकार्य
तोफखाना पोलिसांचे गुन्हे शोध पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दीपक परदेशी यांचा शोध घेत आहे. त्यांच्या बेपत्त्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास संबंधितांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
माहिती मिळाल्यास
दीपक परदेशी यांच्या बाबतीत कोणतीही माहिती मिळाल्यास, त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
तोफखाना पोलीस स्टेशन: (०२४१) २४१६११८
मोबाईल क्रमांक: ८३२९३३७००६, ९२२५४४४४४, ८९९९४४६९४२
पत्ता: दीपक ऑईल डेपो, छाया टॉकीज जवळ, चितळे रोड, अहिल्यानगर
कुटुंबीय आणि पोलिसांकडून नगरकरांना विनंती करण्यात येत आहे की, दीपक परदेशी यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांचा शोध लावता येईल आणि कुटुंबीयांची चिंता दूर होईल