२ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शहरातील नागरीक हा महागाईने त्रस्त आहे व नगरकरांनी कोट्यवधीचा कर भरुन देखील कोणतीही मूलभूत सुविधा नागरिकांना मनपा व्यवस्थित देत नाही. असे असताना नवीन योजनेची अंमलबजावणी करुन नगरकरांना लुटण्याचा घाट मनपा घालत आहे.
मनपाने ही योजना त्वरीत मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मनपा उपायुक्त यांना निवेदन दिले.
मनपाने शहरातील विविध ठिकाणी ‘पे अँड पार्क’ योजनेची अंबलबजावणीची घोषणा केली आहे.
यामध्ये शहराच्या मुख्य मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील प्रमुख रहदारीचे रस्ते, जागा यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात शहरातील नागरीक हा महागाईने त्रस्त आहे व नगरकरांनी कोट्यवधीचा कर भरुन देखील कोणतीही मूलभूत सुविधा नागरिकांना मनपा व्यवस्तीत देत नाही.
असे असताना नवीन योजनेची अंमलबजावणी करुन नगरकरांना लुटण्याचा घाट मनपा घालत आहे. मनपाने ही योजना त्वरीत मागे घ्यावी, व मनपाकडे स्वमालकीचे भूखंड बाजारपेठेलगत असलेल्या जागेत वाहनतळ निमार्ण करुन नगरकरांना सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मनपा उपायुक्त यांना देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी नागरीकांचा महानगरपालिकेकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलावा व ही योजना त्वरीत रद्द करावी.अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे,युवा सेनेचे विक्रम राठोड, दत्ता जाधव, संतोष गेनपा, दत्ता कावरे, रावजी नांगरे, योगीराज गाडे, प्रशांत गायकवाड, रवींद्र वाकळे, सचिन शिंदे, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते.