अहिल्यानगर – महानगरपालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून शहरात व उपनगरात सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे. अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने एक महिन्याच्या कारवाईचे नियोजन केले आहे. अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाला नियोजनानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
शहरात अतिक्रमणांमुळे रस्त्यावर रहदारीला अडथळा होत आहे. विशेषतः मध्यवर्ती शहरात बाजारपेठ व इतर प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात होत आहेत. वारंवार कारवाई करूनही अतिक्रमणे पुन्हा केली जात असल्याने आता अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
![AMC](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/01/IPO-2025-2.jpg)
त्यासाठी एक महिनाभर विविध भागात ही कारवाई केली जाणार आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य, टपऱ्या, हातगाड्या, फलक व इतर कोणतेही साहित्य यापुढे कोणाही अतिक्रमण धारकाला परत केले जाणार नाही. वारंवार कारवाई करून दंड आकारून सोडण्यात आलेल्या टपऱ्या, हातगाड्या पुन्हा अतिक्रमण करण्यासाठी वापरल्या जात आहेत.
त्यामुळे नाईलाजास्तव महानगरपालिकेला हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून कारवाईत कोणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
कोणत्या दिवशी कुठे होणार कारवाई
अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाकडून १० फेब्रुवारी रोजी स्वस्तिक चौक-पुणे बस स्टॅण्ड-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-मार्केटयार्ड चौक-माळीवाडा वेस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,
११ फेब्रुवारी रोजी हातमपुरा चौक-जुने जिल्हाधिकारी कार्यालय-जीपीओ चौक-अशोका हॉटेल-झेंडीगेट परिसर, १२ फेब्रुवारी रोजी माळीवाडा वेस-आशा टॉकीज परिसर-भिंगारवाला चौक-एम.जी. रोड-मोचीगल्ली-गंजबाजार परिसर, १३ फेब्रुवारी रोजी माणिक चौक-भिंगारवाला चौक-एम.जी. रोड, शहाजीरोड,नविपेठ-बैंक रोड-लक्ष्मीबाई कारंजा- गांधी मैदान- चितळेरोड, १४ दाळमंडई-आडतेबाजार-तेलीखुंट-चितळेरोड-नेहरु मार्केट-चौपाटी कारंजा-दिल्लीगेट, १७ फेब्रुवारी रोजी जुना दाणे डबरा-मंगलगेट परिसर-राज चेंबर-कोठला परिसर-एस.टी.वर्कशॉप-रामवाडी,
१८ फेब्रुवारी रोजी सर्जेपुरा चौक-रंगभवन-लालटाकी परिसर- सिव्हील हॉस्पीटल, २० फेब्रुवारी रोजी दिल्लीगेट-सिध्दीबाग-बालिकाश्रमरोड-सावेडीगांव, २१ फेब्रुवारी रोजी टी.व्ही. सेंटर-प्रोफेसर कॉलनी-भिस्तबागरोड-भिस्तबागचौक-पाईपलाईनरोड-श्रीरामचौक-शिलाविहार-गुलमोहरोड पोलीस चौकी-पारिजात चौक-गुलमोहररोड ते भिस्तबाग रोड, २४ फेब्रुवारी रोजी पत्रकारचौक-मनमाड रोड-नागापुर-मनपा हद्दी पर्यंत,
२५ फेब्रुवारी रोजी हॉटेल चैतन्य क्लासिक-काकासाहेब म्हस्के कॉलेज ते गांधीनगर, २७ फेब्रुवारी रोजी पाईपलाईनरोड-डी मार्ट-बंधनलॉन-आठरे पाटील पब्लीक स्कुल तपोवनरोड-भिस्तबाग महाल-नानाचौक-ढवणवस्ती ते जुना पिंपळगांवरोड, २८ फेब्रुवारी रोजी कोठला स्टॅण्ड-डी.एस.पी चौक-छत्रपती संभाजी महाराज रोड-वसंत टेकडी ते इंद्रायणी हॉटेल पर्यंत, ३ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज रोड-फरिस्ट ऑफिस ते बडी मस्जीद-पाण्याची टाकी ते मेराज मस्जीद ते राजनगर, गाडे शाळा- टॉपअप पेट्रोल पंप,
४ मार्च रोजी कोठला स्टॅण्ड-जीपीओचौक-चांदणी चौक-कोठी चौक-मार्केट यार्ड चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-सक्करचौक-कायनेटीक चौक, ५ मार्च रोजी सक्कर चौक-मल्हार चौक-रेल्वे स्टेशन परिसर-कायनेटीक चौक,
६ मार्च रोजी कायनेटीक चौक-केडगांव-अंबिकानगर बस स्टॉप व केडगांव परिसर, ७ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-चाणक्य चौक-बुरुडगांवरोड-यश पैलेश हॉटेल-आनंदऋषी हॉस्पीटल-चाणक्य चौक-महात्मा फुले चौक ते कोठी, १० मार्च रोजी सक्कर चौक-टिळकरोड-आयुर्वेद कॉलेज-अमरधाम-नेप्तीनाका-कल्याणरोड-रेल्वे उड्डाणपुल या नियोजनानुसार कारवाई करण्यात येणार आहे.