अहिल्यानगरच्या महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक राज आहे. नगरसेवकांची मुदत संपल्याने प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे हे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. यावेळचा अर्थात सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी स्थायी समितीत आज (दि.१२) सादर केला. जवळपास १ हजार ६८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला. या आर्थिक वर्षात स्वउत्पन्नासह केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून अनेक प्रकल्प मार्गी लागणार असल्याचा विश्वास यावेळी
यशवंत डांगे यांनी व्यक्त केला.
*कशासाठी किती रक्कम ?

वेतन, भत्ते व मानधनावर १७० कोटी ६४ लाख, पेन्शन ५४ कोटी, पाणी पुरवठा वीज बिल ४० कोटी, स्ट्रीट लाईट वीजबिल ८ कोटी, शिक्षण विभाग वेतन हिस्सा व इतर खर्च हिस्सा ६ कोटी, महिला व
बाल कल्याण योजना ३ कोटी २५ लाख, अपंग पुनर्वसन योजना ३ कोटी २५ लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना ८ कोटी ४१ लाख, औषधे व उपकरणे १ कोटी ७० लाख, कचरा संकलन व वाहतूक ५८ कोटी, पाणी पुरखता साहित्य खरेदी व दुरुस्ती १ कोटी, टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी २ कोटी ७५ लाख, अशुध्द पाणी आकार ४ कोटी, विविध वाहने खरेदी ३ कोटी, नविन रस्ते ३०० कोटी, रस्ते दुरुस्ती ३ कोटी, इमारत दुरुस्ती ५५ लाख, शहरातील ओढे नाले साफसफाई ५५ लाख, आपत्कालीन व्यवस्थापन ५० लाख, वृक्षारोपण तदनुषंगिक खर्च १ कोटी, हिवताप प्रतिबंधक योजना ६० लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी १ कोटी १६ लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त ९५ लाख, मालमत्ता सर्वेक्षण १० कोटी, मृत जनावरे विल्हेवाट प्रकल्प ३५ लाख, पुतळे बसविणे २ कोटी, भविष्य निर्वाह निधी तूट २ कोटी ५० लाख, बेवारस प्रेत विल्हेवाट ४० लाख, उद्यान दुरुस्ती २५ लाख यासह इतर बाबींबर खर्च अपेक्षीत आहे.
*महत्वपूर्ण कामे व त्यावरील खर्च
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा २० कोटी, मुलभूत सुविधा विकास निधी ७० कोटी, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा १५ कोटी, अमृत शहर पाणी पुरवठा फेज २ – १२ कोटी, नाट्य संकुल १० कोटी, रस्ता अनुदानातून रस्ते – ३ कोटी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान १०० कोटी, नाविन्यपूर्ण योजना ४ कोटी, नागरी घनकचरा व्यवस्थापन १० कोटी ८३ लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना १० कोटी, ई बस १२ कोटी, संविधन भवन १५ कोटी, जिल्हा ग्रंथालय इमारत बांधणे १५ कोटी, दलितेतर वस्ती सुधारणा २४ कोटी, सर्वांसाठी घरे ३० कोटी, अमृत योजना भुयारी गटर योजना ३७ कोटी ५० लाख, अमृत योजना मलनिःसारण केंद्र उभारणे २१ कोटी २५ लाख, २ मेगावॅट सौर उर्जा निर्मीती प्रकल्प १०० कोटी, खासदार निधी ५ कोटी, आमदार निधी १६ कोटी.