अहिल्यानगर जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही बिबट्यांची अगदी उच्छाद मांडला आहे. प्राण्यांवर हल्ले सुरूच आहेत परंतु आता माणसांवर देखील हल्ले सुरू आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्यांची मोठी दहशत पाहायला मिळते. वनविभागाच्या मते अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या अंदाजे ४५० इतकी आहे.
मागील तीन वर्षांचा अंदाज जर पाहिला तर एक अंदाजे १५ व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. तर बिबट्यांनी साधारण ९ हजारांवर पाळीव जनावरांचा फडशा पडला असल्याचाच अंदाज वनविभागाच्या एका माहितीनुसार समोर आला आहे.

पूर्वी बिबटे प्रामुख्याने अकोले तालुक्यातील डोंगररागांत रहायचे. मात्र त्यांचा अधिवास आता पार पाथर्डी सारख्या दुष्काळी टापूपर्यंत पोहचला आहे. गर्भागिरीच्या डोंगर रांगातून तो पुढे बीड जिल्ह्याच्या परिसरात पोहचला आहे. बिबट्याचा जास्त उपद्रव प्रामुख्याने जिल्ह्याच्या उत्तर भागात आहे. याला अटकावासाठी वनविभागाकडे १९४ पिंजरे उपलब्ध आहेत.
कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, पारनेर, नगर, नेवासे, श्रीगोंदे, संगमनेर, अकोले या तालुक्यात बारमाही ऊस, मका, नेपियर गवत व फळबागांचे क्षेत्र आहे, मुळा, प्रवरा, गोदावरी या नद्यांमुळे पाणी मुबलक आहे. वाढते बागायती क्षेत्रामुळे बिबट्यांना लपण्यास मोठी जागा मिळेत. त्यातून बिबट्या शेतकऱ्यांच्या वस्तीवर येत जनावरे, माणसांवर हल्ले करताना दिसतो.
दरम्यान, वनखात्याच्या विविध उपाययोजना देखील सुरु आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी दोन प्रशिक्षित शिघ्र बचावदल आहेत. त्यातील एक संगमनेर व एक अहिल्यानगर येथे आहे. गावोगाव जनजागृती, बिबट्यांचा वावर असलेल्या भागात ट्रॅप कॅमेरे लावले जातात. बिबट्यांचे पगमार्क, विष्ठा व फोटोबाबत दैनंदिन तपासण्या होतात. बिबट्या माणसांपासून दूर जावा, यासाठी इतर तृणभक्षी वन्य प्राण्यांची संख्या वाढविणे, रेस्कुसाठी पिंजरे लावणे, उसतोडी वेळी खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जातात. यासह विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत.