राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातील ३२ वर्षांची महिला बेपत्ता झाल्यानंतर तिला बिबट्याने ओढून नेले असावे अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. तिचा शोध जवळपास २०० एकरात घेतला गेला. परंतु आता ही महिला नेवासा येथील आपल्या नातेवाईका सोबत ‘मिस्टर इंडिया’ झाली होती अशी माहिती समोर आली आहे. राहुरी पोलिसांनी या महिलेचा शोध लावल्याने स्थानिक ग्रामस्थांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
ही महिला बेपत्ता झाल्यावर अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. या महिला बिबट्याने ओढून नेले असावे अशी शंका ग्रामस्थांना व्यक्त केली होती. दोन दिवस रात्रंदिवस ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी तिचा शोध घेत होते .मात्र राहुरी पोलिसांनी तपासाचे कौशल्य राबवून ही महिला नेवासा येथील नातेवाईकाबरोबर गायब झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची माफी मागून झालेल्या घटनेवर पडदा टाकला.

राहुरी तालुक्यातील बारगाव नांदुर येथील 32 वर्षाची महिला बारागाव नांदूर आणि डिग्रसच्या शिवारात शेतात चारा आणायला गेली होती. ती नेहमीप्रमाणे कामाला गेली पण संध्याकाळ झाली तरी घरी परतली नाही. काळजी वाटून लागल्याने नातेवाईकांनी तिचा शेतात शोध सुरू केला. परिसरातील २५० ते ३०० एक्कर शेतात या महिलेस वन विभागाचे कर्मचारी व गावातील ७०० ते ८०० तरुणांनी रात्री १० वाजे पर्यंत शोध घेतला परंतू या महिलेचा तपास लागला नाही. बिबट्याने या महिलेस ओढून नेले असेल तर शरीराचे काही अवषेश सापडणे गरजेचे होते.
परंतू असे अवशेष कुठेच दिसले नाही. शेतात गेल्यावर चारा आणण्यासाठी नेलेले कापड सापडलं होते. हे कापड पाहून त्यांचा संशय बळावला होता. कदाचित तिला बिबट्याने शेताजवळच्या उसाच्या मळ्यात ओढून नेलं असावे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी लगेच वन विभागाला कळवलं.वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली.
वनपाल युवराज पाचरणे, वनक्षेत्रपाल राजू रायकर आणि कर्मचारी गोरक्षनाथ मोरे, ताराचंद गायकवाड यांच्यासह ७०० ते ८०० तरुण शोधकार्यात सामील झाले. त्या महिलेचा शोध घेतला पण हाथी मात्र काहीच लागले नाही.शोध घेणाऱ्या शेतकऱ्यांना महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसूत्राची पोत एका शेतात सापडली. त्या दिशेने शोध घेतला. परंतू त्या महिलेचा काहीच पत्ता लागला नाही.
रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही ती महिला सापडली नाही.राहुरीचे पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला. तांत्रिक माहिती व काही शक्यता गृहित धरुन पोलिसांनी कौशल्य पणाला लावून तपास केला असता सदरची महिलाही तिच्या नातेवाईकासोबत शेतातून पळून गेली असल्याचे तपासातून समोर आले आहे. या महिलेने वन विभागासह ग्रामस्थांना कामाला लावले.