Ahilyanagar News : तहसीलदारांच्या निलंबनानंतर अहिल्यानगरमध्ये पुन्हा मोठी कारवाई ! ‘तो’ मोठा अधिकारी लाच घेताना ताब्यात

Published on -

श्रीगोंदा : श्रीगोंद्यांचे दुय्यम निबंधक सचिन खताळ लाचलुचपतच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत.पंधरा हजार रुपयांची मागणी करत तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना त्यांना पकडले आहे.

तक्रारदार हे खरेदी विक्री व्यवसाय करत असल्याने त्यांची दुय्यम निबंधक कार्यालयात नियमित दस्त नोंदणी होत असते. त्यांच्याकडे दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीसाठी पाच हजार व मागील दस्त नोंदणीची बाकी दहा हजार असे पंधरा हजार रुपये दिल्यानंतरच दस्तांची नोंद होईल असे सांगत पंधरा हजार रुपयांची मागणी केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना श्रीगोंदा दुय्यम निबंधक सचिन खताळ यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

ही घटना बुधवारी दिनांक २६ मार्च रोजी संध्याकाळी घडली. दुय्यम निबंधक सचिन खताळ याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकाच महिन्यात लाचलुचपत विभागाची श्रीगोंदा तालुक्यात ही दुसरी कारवाई झाल्याने शासकीय कर्मचाऱ्यात एकाच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यातील सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक नसल्याने त्यांना कोणाचीही भीती उरलेली नाही. त्यामुळे सर्व काही आलबेल असल्याने कर्मचारी नागरिकांना वेठीस धरत असून नागरिकांची कामे होत नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होतेय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News