नगर रस्त्यात सुरु असलेले भांडण पाहण्याकरता थांबलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून, लाकडी दांडक्याने चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना नालेगाव येथील सातपुते तालीम जवळ १७ मार्च रोजी रात्री १०.१५ ते १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत आर्यन देविदास पेंडम (वय २१, रा. वारुळाचा मारुती कमानी जवळ मुनिसिपल कॉलनी, अ.नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आर्यन पेंडम हा त्याचा मित्र ओंकार बोरुडे (रा. नालेगाव) याच्यासह शिवजयंती उत्सव मिरवणूक पाहून मोटारसायकलवरुन घराकडे जात असताना नालेगाव येथे सातपुते तालीम जवळ काही लोकांचे भांडण सुरु होते. तेव्हा आर्यन पेंडम

याने तेथे थांबून गर्दीतील एका व्यक्तीला काय रे काय झाले असे विचारले तेव्हा त्याचे तेथे असलेला राकेश पाखरे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) हा त्याच्याकडे आला व ओमकार बोरुडे यास ढकलून देऊन कोयत्याने आर्यनच्या डोक्यावर मागील बाजूस जोराने वार केला. त्यामुळे पेंडम हा मोटारसायकल तिथे सोडून पळू लागला असता त्याच्यामागे अज्ञात व्यक्तीने येऊन त्याच्या हातातील कोयत्याने पाठीवर मारले. इतर दोघांनी लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आर्यन हा येथून कसाबसा जीव वाचवून पळाला. त्यामुळे मारहाण करणारे मोटारसायकलवरून निघून गेले. याप्रकरणी राकेश पाखरे व अन्य तीन अनोळखी इसमाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात