Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील तरुणांसाठी खुशखबर ! नगरच्या ‘या’ कंपन्यांमध्ये प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत ३३५ जागा भरणार, चांगला पगारही मिळणार

अहिल्यानगर मधील तरुणांसाठी एक खुशखबर आहे. पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू झाली असून या योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात ३३५ जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे शिकता शिकता कमवण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी तसेच बेरोजगार तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणारं आहे.

याविषयी सविस्तर जाणून घेऊयात..

पुढील पाच वर्षांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्यासाठी अग्रगण्य अशा ५०० कंपन्यांसोबत केंद्र शासनाने करार केला आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक इंटर्नसाठी रूजू होतेवेळी एकरकमी ६ हजार रुपये व प्रतिमाह ५ हजार रुपये एकूण ६६ हजार रुपयांचे वार्षिक अनुदान दिले जाईल.

अहिल्यानगर जिल्ह्यात एक्साईट इंडस्ट्रिल लि., इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि., जुबीलॅन्ट फुडवर्क लि., रिलायन्स इंडस्ट्रिज लि., हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट लि., बजाज ऑटो लि., टाटा कन्सल्टंसी सर्व्हिस लि., हॅवल्स इंडिया लि, एचडीएफसी बँक लि, बजाज फायनान्स लि. व सिग्नीफाय इनोव्हेशन्स इंडिया लि. आस्थापनांमध्ये एकूण ३३५ या पदांसाठी संधी उपलब्ध झालेली आहे.

अर्ज कसा करणार ?

या योजनेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी https://pminternship.mca.gov.in या लिंकवर नाव नोंदणी करावी.

पात्रता काय?

पूर्णवेळ शिक्षण घेणारे किंवा बेरोजगार २१ ते २४ वर्ष वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा लाखापेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील एकही सदस्य शासकीय नोकरीमध्ये नसावा असे काही निकष यात ठेवलेले आहेत.