Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये ‘या’ गावांत गारपीट, अवकाळीचा तडाखा

अहिल्यानगरमध्ये पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागासह पश्चिम भागात अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर पठारा मधील हिवरगाव पठार, निमज ,नांदुरी दुमाला, सावरगाव तळ, चंदनापुरी मिर्झापूर ,धांदरफळ खुर्द या गावांना गारपिटीने झोडपले. अवकाळी पावसाचा जोर इतका होता कि काही काळ डोंगरकडेही जोरात वाहू लागले होते.

या गारपिटीमुळे कांदा ,उन्हाळी बाजरी, गहू, डाळिंब आदी शेतात उभ्यासांच्या पिकांची मोठी नासाडी झाली आहे. यामुळे शेतातील उभे पीक कोलमडल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी माजीमंत्री थोरात यांनी केली आहे.थोरात यांनी म्हटलंय की, शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून उत्पन्न घेतले आहे.

हे करताना त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. ऐकिले बाजार भाव नाही, दुसरीकडे कर्जाचा डोंगर, आणि यात आता गारपिटीने झालेले नुकसान, यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी माजीमंत्री थोरात यांनी केली आहे. दरम्यान जिल्ह्यातही अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.