Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पशुहत्या होणाऱ्या यात्रेत ऐतिहासिक निर्णय ! यंदा पशुहत्येवर संपूर्ण बंदी

या यात्रेला भटक्या समाजाचा मोठा सहभाग असतो. स्थानिक बोलीमध्ये या देवस्थानाला "विंचू काट्याचे देवस्थान" म्हणूनही ओळखले जाते, कारण इथे सर्पदंशावर उपचार व संरक्षणाची श्रद्धा आहे. यामुळे यात्रेला एक आगळं वेगळं आध्यात्मिक महत्व प्राप्त झालं आहे.

Published on -

Ahilyanagar News : सर्पदंश, विचू दंश झाल्यास ज्या देवापुढे साकडे घातले जाते, असे पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी गावचे ग्रामदैवत सालसिद्ध बाबा तीन दिवस यात्रोत्सव आहे. पाथर्डी तालुक्यातील मढी नंतर सर्वांत मोठी यात्रा म्हणून या यात्रेकडे बघितले जाते. भगवानगडाचे महंत डॉ नामदेव शास्त्री यांच्या हस्ते मूर्तीला जलाभिषेक करून यात्रेला प्रारंभ होणार आहे.

दरम्यान सर्वाधिक पशुहत्या होणाऱ्या यात्रेमध्ये यंदा पशुहत्येला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. रविवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री व देवस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज शास्त्री यांच्या हस्ते नागदेवतेला जलाभिषेक होऊन कावडीने आणलेल्या पाण्याने भाविकांकडून मूर्तीला जलाभिषेक होणार आहे.

हजारो भाविक पैठण वरून कावडीने पाणी आणतात. सोमवारी कुस्ती हगामा, लोकनाट्य तमाशा व लावण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत गैरप्रकार होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल होते. संपूर्ण परिसर ऊस तोडणी कामगारांचा असल्याने खरीप हंगामासाठी लागणारी शेती अवजारे स्टेशनरी कटलरी खेळणी व हलवाई व्यापारी मोठ्या प्रमाणावर परिसरातील दोन जिल्ह्यातून येतात.

राष्ट्रीय महामार्गावरील खरवंडी पासून पाच किमी अंतरावर मिडसांगवी आहे. तेथून पुढे बीड जिल्ह्याची हद्द सुरू होते. या यात्रेसाठी भटका समाज मोठ्या संख्येने येतो. स्थानिक बोली भाषेत याला विंचू काट्याचे देवस्थान म्हणूनही ओळखले जाते.

भगवानगडाचे संत भगवान बाबा त्यांचे नंतर स्व. भीमसिंह महाराज व आता मठाधिपती डॉ. नामदेव शास्त्री हे या गावच्या व परिसराच्या गुरुस्थानी असल्याने भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठातील विद्यार्थी असणारे हनुमान सातपुते महाराज यांची मठाधिपती म्हणून गेल्या आठ वर्षांपासून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचा विकास सुरू आहे.

तहसील कार्यालयात प्रांत प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांना देवस्थान समिती व विश्व हिंदू परिषदेतर्फे यात्रेत मांसाहार होऊ नये, भाविकांनी व ग्रामस्थांनी यात्रेच्या तीन दिवसांमध्ये पशुहत्येला बंदी घातली आहे, असे निवेदन दिले. ग्रामसभेने सुद्धा यावर्षी असा निर्णय घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News