सोनई : गुढीपाडवा आणि शनी अमावस्याचे औचित्य साधून शनिशिंगणापूर मध्ये सात लाख भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दिवसभर शनी भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती. खा. श्रीकांत शिंदे, आ.विठ्ठलराव लंघे, आ. संग्राम जगताप, आ. उडण हिम्मत, आमदार श्वेता महाले, माजी खा. सदाशिव लोखंडे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, पद्मश्री पोपटराव पवार, माजी खा. चंद्रकांत खैरे आदींसह भाजपचे सचिन देसरडा, प्रताप चींधे यांच्यासह अनेक विशेष अतिथी उपस्थित होत्या.
अतिथींचे देवस्थानच्या वतीने अध्यक्ष भागवत बनकर उपाध्यक्ष विकास बानकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे, विठ्ठल आढाव, सरचिटणीस अप्पासाहेब शेटे, प्रा.शिवाजी दरंदले, ऍड.साईराम बानकर, संभाजी दहातोंडे हे स्वागत करत होते. पु.ना.गाडगीळचे संचालक सौरभ गाडगीळ यांनी देवस्थानला दहा तोळे सोने अध्यक्ष भागवत बनकर यांच्या हस्ते दान केले.

ऍडिशनल एस.पी.कलबुर्गीय, अप्पर पोलीस उपविभागीय अधीक्षक सुनील पाटील, शनीभक्त राकेश शर्मा, राकेश कुमार उपस्थित होते. देवस्थान मंदिर परिसरात उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय बिराजदार हे दिवसभर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. जनसंपर्क कार्यालय अंतर्गत शिंगणापूरचे पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नितीन सप्तर्षी, नितीन भागवत व ज्ञानेश्वर माळवे हे विशेष लक्ष देऊन होते.
दानपेटीत रोख दान करण्यासाठी भाविक रेलचेल करताना दिसत होते. सुरक्षा व्यवस्था म्हणून सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर उपविभाग पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष शेळके, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यात्रा सुरळीत, आनंददायी, समाधानकारक झाल्याने देवस्थानचे विशेषता पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात होते. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
दहा तोळे सोने अन बर्फी विक्री ठरली आकर्षण
देवस्थान मार्फत 20 रुपये किमतीत दिल्या जाणाऱ्या बर्फी प्रसादाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यातून लाखो रुपयांची प्रसाद विक्री झाली आहे. तसेच पु.ना.गाडगीळचे संचालक सौरभ गाडगीळ यांनी देवस्थानला दहा तोळे सोने अध्यक्ष भागवत बनकर यांच्या हस्ते दान केले.