एका वयस्कर व्यक्तीला वाचविण्याच्या नादामध्ये पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्ग वरून जाणारी बस पलटी होऊन अपघात झाला. या झालेल्या अपघातात जीवित हानी झाली नसली तर अनेक जखमी झाले आहेत.
जखमी प्रवाशांना दोडी ग्रामीण रुग्णालयातील माजी सैनिक आणि आरोग्य सेवक अशोक खताळ यांनी माणुसकीची भावना दाखवत जखमी रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जात असताना अचानक समोरून वयस्कर व्यक्ती बसच्यासमोर आली.

त्या व्यक्तीला वाचविण्याच्या नादात एस टी बस पलटी झाली त्यामध्ये संगमनेर व आळेफाटा या ठिकाणचे अनेक प्रवासी जखमी झाले. या घटनेची माहिती दोडी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणारे आरोग्य सेवक अशोक खताळ यांना समजली त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन अनेक रुग्णांना बसमधून बाहेर काढले व उपचारासाठी दोडी आरोग्य केंद्रात दाखल करून तर प्राथमिक उपचार करून काही रुग्णांना संगमनेर आणि आळेफाटा येथे नेण्यात आले.
दरम्यान, माजी सैनिक आणि दोडी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य सेवक अशोक खताळ यांनी अनेक प्रवाशांना जीवदान दिले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक आ. अमोल खताळ यांनी करून त्यांचा सन्मान करत असेच मानवतेचे काम तुमच्या हातूनव्हावे अशी सदिच्छा व्यक्त केली.
वेळेस त्यांना उपचार मिळाल्यामुळे अनेकांचा जीव वाचविण्याचे पुण्याचे काम आरोग्य सेवक अशोक खताळ यांनी केले त्यामुळे त्यांचा माजी सैनिक संघटनांतर्फे व सैनिक कल्याण समितीतर्फे कौतुक करण्यात आले.













