Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये थंडपेयात गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडीओही काढले

Published on -

अहिल्यानगरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसतायेत. नुकत्याच काही घटना ताजा असून आता पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली आहे.थंडपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (२१ मार्च) सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.

करण असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान घडला. एक १७ वर्षीय मुलगी हॉटेलवर गेली असता तिच्यासोबत बळजबरीने फोटो काढले.

त्यानंतर संशयित आरोपीने १२ डिसेंबर २०२४ रोजी पीडितेला घेऊन जाऊन थंडपेयामध्ये तिला गुंगीचे औषध पाजले व पीडितेवर अत्याचार केला. त्याचा संशयित आरोपीने व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संशयित आरोपीने २३ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा पीडितेवर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

शहरातून आणखी दोन मुली बेपत्ता

गेल्या २ दिवसांत २ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्यात. शहरातील एका कॉलेजच्या आवारातून आणि नगर तालुक्यातील आगडगाव येथे घडल्या आहेत. या प्रकरणी कोतवाली व नगर तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे राहणारी अल्पवयीन मुलगी (वय १७) २२ मार्चला सकाळी नगर शहरातील एका कॉलेज मध्ये ११ वी चे पेपर देण्यासाठी आली होती.

तिला तिच्या वडिलांनी मोटारसायकलवर कॉलेजबाहेर सोडले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत मुलगी घरी न आल्याने त्यांनी मुलीच्या फोनवर तिला फोन केला असता तिचा फोन बंद लागला. तिची सायंकाळपर्यंत वाट पाहिली परंतु ती घरी आली नाही. २ दिवस तिचा शोध घेवूनही ती न सापडल्याने तिच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत नगर तालुक्यातील आगडगाव येथे राहणारी अल्पवयीन मुलगी (वय १७) ही २३ मार्च रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास तिच्या घराच्या अंगणात इतर मुलांच्या समवेत लपाछपी खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe