Ahilyanagar News : ना वाहन क्रमांक, ना डेपोचे नाव तरीही लालपरी सुसाट ! परिवहन महामंडळाकडूनच नियम धाब्यावर

Published on -

वाहतुकीसंदर्भात अनेक नियम बनवलेले आहेत. सर्वांनाच हे नियम सारखे आहेत. असे असताना राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडूनच हे नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. असच काहीस दृश्य अहिल्यानगर शहरात पाहावयास मिळाले. एसटी बसच्या पाठीमागील बाजूस वाहन क्रमांक नाही, सदर बस कोणत्या डेपोची आहे, याचाही उल्लेख नाही. तरीही ही लालपरी सुसाट रस्त्यावर धावताना दिसली.

सर्वसामान्यांचा प्रवासाचा कणा समजल्या जाणाऱ्या व प्रत्येक जण हक्काने हाक मारणाऱ्या राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या बसेस म्हणजेच सर्वसामान्यांची लालपरी ही सध्या महामार्गावरून धावत असताना अनेक नियम धाब्यावर बसून चालत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अनेक नवीन लालपरी दाखल झालेल्या असल्या तरी जुन्या लालपरीची परवड सध्या तरी थांबलेली दिसून येत नाही अनेक जुन्या बसेस मेंटेनन्स अभावी अनेक ठिकाणी प्रवासी घेऊन जात असताना बंद देखील पडल्या आहेत.

अनेक लालपऱ्या अत्यंत धोकादायक स्थितीत प्रवाशांची वाहतूक करत आहेत. काही ठिकाणी बंद पडलेल्या बसेसमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झालेले पहायला मिळत आहेत. अनेक प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागते असे ठीकठिकाणी पाहायला मिळालेले देखील आहेत. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासाठी एक परिपत्रक जारी केले आहे. एकीकडे असे नियम तर दुसरीकडे या बसला डेपोचे नाव तर नाहीच पण महत्वाची असणारी साधी नंबर प्लेट देखील या बसला नसावी का? असा प्रश्न पडलाय.

राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अशा धोकादायक स्थितीत चालणाऱ्या लालपरींची वेळोवेळी निगराणी व देखभाल अहवाल घेणे आवश्यक आहे, नाहीतर अशा वाहनांकडून चुकून एखादा मोठा अपघात झाल्यास याचा खूप मोठा फटका या लालपरी चालवणाऱ्या वाहन चालकास व अपघातग्रस्त सर्वसामान्य नागरिकांना बसल्याशिवाय राहणार नाही हेही तितकेच खरे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe