अहिल्यानगर जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. अपघात अन अपघातातील मृत्यूच्या काही घटना ताजा असतानाच आता सात वाहनांचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. यांमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेरमधील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटामध्ये हा अपघात झाला. सायंकाळी ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक समोर दुसऱ्या ट्रकला जोरात जाऊन धडकला.
या धडके नंतर सात वेगवेगळी वाहनं एक मेकांवर आदळून विचित्र अपघात झाला सुदैवाने या हातात कुठलीह हानी झाली नसती तरी अपघातग्रस्त वाहनांचे मोठ्याप्रमाणा मध्ये नुकसान झाले आहे. त्यामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात ट्रक (एमएच ४१ ए क्यू ७३०७) मंचरवरून ऊस घेऊन लोणी प्रवरेकडे निघाला होता. हा ट्रक घाटात उतारावर असताना अचानक या ट्रकचे ब्रेक निकामी झाले आणि तो समोरच्या वाहनावर जाऊन आदळला.

ही धडक इतकी जोरदार होती की, त्यानंतर एका पाठोपाठ एक अशी ७ वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महामार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना या अचानक घडलेल्या प्रकाराचा त्रास सहन करावा लागला. घटनास्थळी थोडा गोंधळ उडाला, पण जीवितहानी टळल्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. चंदनापुरी घाटात याआधीही अनेक अपघात झाले आहेत. यात जीवितहानीही झालेली आहे. या भागातील संबंधित काही दुरुस्त्यांकरता अनेकदा आंदोलनेही झाले आहेत.