नगर – दौंड या मार्गावरील नगर बीड रेल्वे लाईनला ओलांडणीपुलाचे बांधकाम सुरु होत असल्याने कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास या रोडवरील येणारी व जाणारी सर्व प्रकारच्या जड वाहतुक मार्गात १ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान बदल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.रेल्वे उड्डाणपुलाच्या या बांधकामासाठी साईटच्या जवळ मोठमोठे गर्डर बनविण्यात आलेले आहेत. हे गर्डर बसविण्यासाठी मोठे क्रेन व ट्रेलर वापरण्यात येणार आहेत.
कायनेटिक चौक तेअरणगाव बायपास रोड हा रहदारीचा असल्याने अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे १ एप्रिल रोजीचे सकाळी ८ ते १० एप्रिल रोजीचे रात्री ८ वाजे पर्यंत नगर दौंड या मार्गावरील कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास या रोडवरील येणारी व जाणारी सर्व प्रकारची जड वाहतुक खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.कायनेटीक चौकातुन दौंड रोडने अरणगाव बायपासकडे जाणारे वाहनांकरीता कायनेटीक चौक केडगाव, केडगाव बायपास,अरणगाव बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील.

अरणगाव चौकातुन कायनेटीक चौकाकडे येणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग अरणगाव बायपास केडगाव वायपास केडगाव कायनेटीक चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच पुणेकडुन दौंड रोडला जाण्यासाठी कायनेटीक चौकात येणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग केडगाव बायपास, अरणगाव बायपास, दौंड रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. या आदेशचे पालन करून नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी केले आहे.