Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये दोन भीषण अपघात ! दोन ठार तिघे जखमी

Published on -

नगर-सोलापूर महामार्गावर वाळुंज (ता. नगर) गावच्या शिवारात मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २५ मार्चला सकाळी घडली. परवेज बशीर शेख (वय ३३, रा. वाहिरा, ता. आष्टी, जि.बीड) असे मयताचे नाव आहे.

मयत परवेज शेख हा आपल्या दुचाकीवर नगरहून सोलापूरच्या दिशेने चाललेला होता. वाळुंज गावच्या शिवारात पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत तो मालट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मयत झाला.

घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक भरत धुमाळ यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेत अपघाताला कारणीभूत ठरलेला मालट्रक व त्याचा चालक यांना ताब्यात घेतले. मयत परवेज शेख याच्या मृतदेहाचे दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

सहाय्यक फौजदार गुंजाळ यांनी याबाबतची प्रक्रिया पार पाडली. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादी नंतर ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तर दुसऱ्या घटनेत नगर-पुणे महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात पळवे शिवारात झाला. यामध्ये देखील एकाच मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले. पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द शिवारात हा अपघत झाल्याची माहिती समजली असून कैलास आबासाहेब बेंद्रे (वय ४१, रा. आंबळे, ता. शिरूर) हे यात मृत झाले आहेत. तर यात तिघे जखमी झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe