Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये मागील काही दिवसात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने उंचावताना दिसत असून खून, दरोडे, अत्याचार आदी घटनांनी जोर धरला आहे. आता शहरातून एक मानवतेला काळिमा फसवणारी घटना उघडकीस आली आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे या अत्याचाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून पतीच्या इंस्टाग्राम आयडीवर पाठवण्यात आले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पीडिताने पोलिसांनी फिर्यादीने दिली आहे. या दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संगमनेर तालुक्यातील तरुणाविरूध्द बुधवारी (१२ मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय निळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. श्रमिकनगर, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. अजय निळे याने जुलै २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात दुपारी १२ ते दोनच्या दरम्यान तसेच २८ जानेवारी २०२५ ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान पीडितेच्या राहत्या घरी अनधिकृतपणे प्रवेश करून झालेले लग्न मोडण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर अजयने पीडितेचे व्हॉट्सअॅप कॉल आणि व्हिडीओ रेकॉर्ड करून तिच्या पतीच्या इंस्टाग्राम आयडीवर पाठवले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पीडिताने १२ मार्च रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सदरचा प्रकार सांगितला. पोलिसांनी अजय निळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी घटना वाढीला लागल्या आहेत. चोरी, दरोडे, खून आदी घटना घडलेल्या आहेत. अत्याचाराचे घटनांनी देखील शहराला आता काळिमा फासला आहे.