अहिल्यानगर- लग्नात महागडे कपडे घालण्याचा खर्च वाचवण्यासाठी आता नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी भाड्याचे कपडे घालून मिरवायला लागली आहेत.
दुकानात नव्या शेरवानीची किंमत ४ ते २५ हजार, जोधपुरी २५०० ते ८ हजार आणि ब्लेझर २५०० ते १० हजार रुपये आहे. पण हे सगळे कपडे भाड्याने घेतले तर तीन दिवसांसाठी ब्लेझर १ हजार ते १५०० आणि शेरवानी अडीच हजार ते ५ हजारात मिळतेय.

गेल्या काही वर्षांपासून लग्नात भाड्याचे कपडे घालण्याचा ट्रेंड वाढलाय. तीन दिवसांसाठी १ हजार ते ५ हजारात कपडे मिळतात. नवरदेवाला इंडो-वेस्टर्न शेरवानी आवडते, त्यासाठी १ हजार ते ५ हजार भाडे आहे. नातेवाईक आणि मित्र जोधपुरी किंवा ब्लेझर घेतात, त्यासाठी १ हजार ते १५०० रुपये लागतात.
व्यावसायिक शुभदा डोळसे सांगतात की, हे भाडे तीन दिवसांचं आहे. मागच्या लग्नसराईत १०० हून जास्त बुकिंग झाली होती. आता एप्रिल आणि मे साठी आतापर्यंत जवळपास ५० बुकिंग झालीय. हलक्या रंगाचे ड्रेस जास्त बुक होतायत, असं त्या म्हणाल्या.
लग्नसराईच्या काळात भाड्याने कपडे देणाऱ्या व्यावसायिकांकडे वधूसाठी नऊवारी, लेहंगा, इंडो-वेस्टर्न, ब्रायडल लेहंगा असे ड्रेस आहेत.
मेकअप आणि दागिन्यांचाही समावेश आहे. हळद, लग्न, डीजे, संगीत अशा प्रत्येक कार्यक्रमासाठी पॅकेज आहे. १ ते ६ हजारांपासून पॅकेज सुरू होतात, असं शुभदा म्हणाल्या. प्री-वेडिंग, मॅटर्निटी फोटोशूटसाठीही ब्रायडल लेहंगा, वन पीस, गाऊन, टेल गाऊन बुक होतायत.
नवा ड्रेस घेतला तर तो फक्त एक-दोन दिवस वापरून मग पडून राहतो. त्यापेक्षा भाड्याने घेणं सोपं पडतंय. आमच्याकडे एप्रिल आणि मे साठी आतापर्यंत ५० ड्रेस बुक झालेत, असं शुभदा डोळसे सांगतात.