अहिल्यानगर- अहिल्यानगरच्या मातीतील कणखर आणि जिद्दी लेकने पुन्हा एकदा जगातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वोच्च शिखर माऊंट लोत्से (२७९४० फूट) सर करण्यासाठी सज्जता दाखवली आहे. गेल्या वर्षी माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवून आणि राष्ट्रगीत गाऊन त्यांनी इतिहास रचला होता. आता त्यांची नवी लक्ष्ये माऊंट लोत्सेवर तिरंगा फडकवण्याची आहेत.
साईबाबांचे घेतले आशिर्वाद
बुधवारी (दि. ९) या मोहिमेसाठी रवाना होण्याआधी द्वारका डोखे यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी माथा टेकून आशीर्वाद घेतला. या मंगल कार्यात साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी डोखे यांना शुभेच्छा दिल्या. या आयोजनात वंदना गाडीलकर, रामेश्वर डोखे, सुवर्णा डोखे आणि कल्याणी डोखे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. माऊंट लोत्सेवर तिरंगा व पोलिस दलाचा ध्वज फडकवण्याच्या उद्देशाने पोलिसांनी अधिकाऱ्यांना नियोजित केले.

संघर्षमय प्रवास
द्वारका डोखे यांचा प्रवास सोपा नव्हता. आर्थिक अडचणी, वैयक्तिक दुखः आणि शारीरिक आव्हानांनी त्यांना खंबीरपणे तोंड दिले. त्यांनी क्राऊडफंडिंग व कुटुंबाच्या मदतीने आवश्यक निधी उभारला आणि आपला झेंडा उंचावला. आई-वडिलांना जगाच्या सर्वोच्च शिखरावरून श्रद्धांजली देण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले होते. आता त्यांच्या नजरा माऊंट लोत्सेवर आहेत आणि गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून त्या शारीरिक व मानसिक तयारीत असलेल्या प्रवासाला नव्या उंचीवर नेण्याचे ठरवले आहे.
अपघाताने सुरूवात
द्वारका डोखे यांचा गिर्यारोहणाचा प्रवास एका अपघाताने सुरू झाला होता. “साद देती हिमशिखरे” या पुस्तकाने त्यांना या साहसी जगाची ओळख करून दिली. वयाच्या ४२व्या वर्षी त्यांनी गिर्यारोहणाला सुरुवात केली आणि कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या या कठीण, निःस्वार्थ आणि प्रेरणादायी प्रवासाने चंद्रखानी, रुपकुंड, मेरा पीक आणि माऊंट एव्हरेस्ट सारख्या अनेक शिखरांची विजयगाथा रचली आहे. डोखे यांची जिद्द आणि साहस प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.