अहिल्यानगरचा ‘या’ प्रकल्पात आला राज्यात पहिला नंबर ! ३ लाख २० हजार शेतकऱ्यांना मिळाला ‘हा’ लाभ…

Mahesh Waghmare
Published:

१४ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : केंद्र सरकारच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीकल्चर अंतर्गत देशभरात अॅग्रीस्टंग प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.या उपक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत ३ लाख २० हजार शेतकऱ्यांना या योजनेत सामावून घेतले असून, राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड देण्याचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. उद्धव महाराज मंडलिक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यावेळी उपस्थित होते.यावेळी १६ हजार ८०९ शेतकऱ्यांनी आपले आयडी कार्ड प्राप्त करून घेतले.या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात येत असून, त्यामध्ये शेतीसह त्यांची मूलभूत माहिती समाविष्ट केली जाते.

मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, यापुढे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी व शेती विषयक व्यवहार करण्यासाठी हा आयडी आवश्यक राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर आयडी कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली असून, शेतीशी संबंधित सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात करणे सोपे होईल.

या योजनेंतर्गत आतापर्यंत ३ लाख २० हजार शेतकऱ्यांनी आयडी कार्ड काढून योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन आपले आयडी कार्ड त्वरित काढावे,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले.

ऍग्रीस्टॅग प्रकल्पाचे महत्त्व

– डिजिटल कृषी मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना युनिक आयडी मिळणार आहे.
– पिकांचे नुकसानभरपाई योजनांचा लाभसहज मिळेल.
– शेतीविषयक अनुदाने व संरक्षण योजना याच माध्यमातून मिळतील.
– शासकीय योजनांसाठी अर्ज करताना सहज प्रक्रिया होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe