Ahmednagar News :अहमदनगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आज रोजी बहुचर्चित उड्डाणपुलाचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील पिलर नं.२७ जवळ नारळ फोडून उदघाटन केल्याचे जाहीर केले. यावेळी अनेकांनी सेल्फी व फोटो काढून आपल्या सोशल मिडीयावर प्रसिध्द केले.
बहुप्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यासाठी शहरातील राजकीय पुढारी प्रयत्न करत आहेत. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शहरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व सामान्य नागरिक एकत्र येत ‘आम्ही अहमदनगरकर’ नावाचा मंच स्थापन केला.
या सर्वांचे म्हणणे होते कि, हा उड्डाणपुल सर्वसामान्य माणसांच्या पैशातून आणि त्यांच्या पाठपुराव्यातून उभा राहिलेला आहे. मुळात हा पुल २५ वर्षांपुर्वीच व्हायला पाहिजे होता परंतु राजकीय साठमारीमुळे व अकार्यक्षमतेमुळे या पुलाला प्रचंड विलंब झाला.
त्याच्या दुष्परिणामामुळे या पुलाचा खर्च प्रचंड वाढला. या रस्त्यावर एकूण ४२ सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेलेला आहे . त्यांचे स्मरण न करता राजकीय पुढारी श्रेयवादासाठी लढत असल्याचे पाहून ‘आम्ही अहमदनगरकर’ या नागरिकांच्या प्रतिनिधींनी पुलाचे नारळ फोडून आज उदघाटन केले व ‘जनता हक्क दिवस’ साजरा केला.
सर्वप्रथम संजय झिंजे, राजेंद्र गांधी, युनूस तांबटकर, संध्या मेढे, भरत खाकाळ, फिरोज शेख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांचा जयघोष करत अभिवादन केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अहमदनगर हॉकर्स संघटनाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे म्हणाले की, मुळात अनेक बळी घेतलेल्या आणि विलंबाने उभा राहिलेल्या पुलासाठी राजकीय पुढारी यांनी श्रेयवादाची लढाई बंद करावी.
या पुलाचे खरे श्रेय जनरेटा उभा करणारे सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता यांचेच आहे. त्यामुळे उदघाटन करण्याचा खरा व प्राथमिक हक्क हा शहरातील जनतेचाच आहे.
येथून पुढे शहरातील मनपा, राज्यशासन अधिकारी यांनी पुढारी यांच्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांच्या हातूनच विकासकामांची उदघाटने करावीत. युनूस तांबटकर म्हणाले की, या पुलाच्या विलंबामुळे शहरातील अनेक लोकांचे बळी गेले आहेत, त्यांचे स्मरण करावे. त्यांच्या नातेवाईकांना सन्मान व नुकसानभरपाई दिली पाहिजे, अशी आम्ही अहमदनगरकर म्हणून भुमिका आहे.
राजेंद्र गांधी म्हणाले की, विलंबाने होत असलेल्या पुलामुळे सर्वसामन्यांचे स्वप्न साकार झाले आहे. ४२ नागरिकांचे बळी घेऊन हा पुल उभा राहिला आहे. यापुलाच्या अक्षम्य विलंबामुळे राजकीय लोकांचे तिकीट कापले गेले होते हा इतिहास आहे.
पुल यशस्वितेसाठी उड्डाणपुल कृती समितीचे फार मोठे योगदान आहे म्हणून उदघाटनाचा खरा हक्क सर्वसामान्यांचाच आहे. भरत खाकाळ म्हणाले, आम्ही नेहमीच आम आदमी सोबत आहोत.
आम आदमी म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या हक्कासाठी आम्ही आज हे उदघाटन करत आहोत. लोकांच्या हक्कासाठी आम्ही सतत रस्त्यावरच्या लढ्यास तयार आहोत.
फिरोज शेख म्हणाले की, उड्डाणपुलाच्या सकारात्मक कामासोबतच शहरातील खड्डेही तात्काळ बुजविले पाहिजेत. खड्ड्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
अनेकांना श्वसनाचे व पाठीचे मणक्याचे आजार वाढले आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. भैरवनाथ वाकळे म्हणाले की, आज ९.११ ‘जनता हक्क दिवस’ आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही अहमदनगरकर सतत कार्यरत राहू. उड्डाणपुलाचे अथवा कोणत्याही विकासकामाचे उदघाटन करणे हा सर्वसामान्य नागरिकांचाच हक्क आहे.
हा हक्क सरकारी अधिकारी व पुढारी यांनी हायजॅक केलेला आहे. कोणतेही काम नागरिकांच्याच पैशातून, पाठपुराव्यातून होत असते म्हणून नागरिकांनीच उदघाटन करणे योग्य आहे.
‘जनता हक्क दिवस’ यशस्वी करण्यासाठी असिफखान दूलेखान, ऋषिकेश आगरकर, रामदास वागस्कर, चंद्रकांत माळी, सुनिल ठाकरे, राजेंद्र कर्डीले, अरूण खिची, दिलीप घुले, धनंजय देशमुख, भाऊसाहेब फुलपगारे आदींनी परिश्रम घेत