अहमदनगर ब्रेकिंग : सासऱ्याचे अनैतिक संबंध, जावयाने केला निर्घृण खून ! आधी गळा कापला नंतर जाळून टाकले

Published on -

समाजात अनेक काळीज पिळवटणाऱ्या घटना घडत आहेत. आता जावयाने सासऱ्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हे हत्याकांड झाले आहे.

गोरख दशरथ बर्डे (वय ४८, रा.लोहारे कसारे, ता.संगमनेर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिनेश शिवाजी पवार (रा. वडगाव कांदळी, ता.जुन्नर) व विलास लक्ष्मण पवार (रा. माळवाडी,साकूर, ता.संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. अनैतिक संबंधाच्या कारणाहून शेजारील व्यक्ती आणि जावयाने सासर्‍यास जाळून मारल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मयत गोरख बर्डे हा आरोपींचा नातेवाईक आहे. त्याचे आरोपींच्या जवळच्या व्यक्तींशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण त्यांना लागली. आरोपींनी याबाबत बर्डे याला समजावून सांगितले.

पण त्याने ऐकले नाही. अखेर त्याचा काटा काढायचा असा निर्णय त्यांनी घेतला. आरोपींनी गोरख बर्डे याला दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी एका लग्नाला बोलविले. लग्न आटोपल्यानंतर रात्री वरात असल्याने गोरख बर्डे वरातीत देखील आला. त्यावेळी तो व ती महिला एका बाजूला गेले व बोलत होते.

त्याचवेळी हे दोघे आरोपी तेथे गेले. बर्डे याच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केले. त्यानंतर त्याचा गळा आवळून ठार मारले व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ज्वलनशिल पदार्थाने चेहरा जाळून टाकला. रणखांब येथील जांभुळवाडी शिवारात त्याला टाकून दिले. काही झालेच नाही या आवेशात ते पाहुण्यांमध्ये सहभागी झाले.

१६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी फॉरेस्ट परिसरात शेळ्या चारण्यास आलेल्या व्यक्तीस मृतदेह दिसला. त्याने याबाबत तत्काळ पोलीस पाटील यांना माहीत दिली. गावकऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

घारगाव पोलिस ठाण्यात माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन दिवसानंतर मयताची ओळख पटली आणि तपासाची चक्रे फिरवताच आरोपीही समोर आले. पोलिसांनी दिनेश शिवाजी पवार व विलास लक्ष्मण पवार या दोघांना अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News