अहमदनगरकर सावधान ! सहा ठिकाणी मोटारसायकलची चोरी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दररोज अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असून, मोटारसायकल चोरीचे सत्र सुरुच आहे. मोटारसायकलस्वारांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात ६ ठिकाणी मोटारसायकल चोरीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसी हद्दीत २ तर कोतवाली, भिंगार, पारनेर, तोफखाना हद्दीत प्रत्येकी १ मोटारसायकल चोरीस गेली आहे.

मदनलाल नाथाजी प्रजापती यांची २० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल सूर्या हॉटेल (अ.नगर) समोरुन १४ डिसेंबर रोजी चोरीस गेली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नितीन मोहन नेटके यांची २५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल कोर्टाच्या गेटसमोरुन चोरट्याने चोरली. ही घटना १४ डिसेंबरला घडली. तसेच वडगाव गुप्ता येथील दत्तनगर परिसरातून सदाशिव सिताराम झावरे यांची तर विकी प्रकाश चव्हाण यांची मोटारसायकल चोरीस गेली.

त्याचप्रमाणे आफताब समीर पठाण यांचीही ३० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल त्यांच्या राहत्या घरासमोरुन चोरीस गेली. त्याचप्रमाणे बन्सी महादेव खोडदे यांचीही मोटारसायकल चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe